राज्यमंत्री मेघना बोर्डीकर एमएसईबी कंपनीच्या उपाध्यक्ष

राज्यमंत्री मेघना बोर्डीकर एमएसईबी कंपनीच्या उपाध्यक्ष

परभणी : मुंबई येथील सह्याद्री अतिथी गृहात २८ डिसेंबर रोजी एमएसईबी होल्डिंग कंपनीच्या पार पडलेल्या बैठकित राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत होल्डिंग कंपनीच्या उपाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांच्या मार्गदर्शनाखाली ऊर्जा विभाग अधिकाधिक लोकाभिमुख करणे, हरित ऊर्जेच्या अधिक वापरावर भर देणे, मराठवाडयासह राज्यातील वीज समस्यांचे निराकरण करणे या बाबत आपली आग्रही भूमिका राहील आसा विश्वास राज्यमंत्री बोर्डीकर यांनी या प्रसंगी व्यक्त केला. बैठकीकरिता प्रधान सचिव (ऊर्जा), महावितरण, महापारेषण, महानिर्मिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!