विवेकानंद विद्यालयात आनंदनगरी मेळावा
विद्यार्थ्यांनी जाणून घेतले व्यावहारीक ज्ञान
सेलू : शहरातील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचलित विवेकानंद प्राथमिक विद्यालयात शालेय अभ्यासक्रमा बरोबरच जीवनातील व्यावहारीक व व्यावसायिक ज्ञान प्राप्त व्हावे या उद्देशाने आनंदनगरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी हरिभाऊ चौधरी, प्रमुख पाहुणे डॉ.प्रवीण जोग, करुणा कुलकर्णी. मुख्याध्यापक शंकर शितोळे, स्नेहसंमेलन प्रमुख शंकर राऊत, सहसंयोजक अनिल कौसडीकर यांची उपस्थिती होती.
डॉ.जोग यांनी विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या सकस आहाराची माहिती सांगितली.आनंदनगरीचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी विविध स्टॉललावून स्वतः बनविलेल्या पदार्थांची विक्री केली. विद्यार्थी पदार्थांची विक्री करताना ग्राहकांना आकर्षित करीत होते. विद्यार्थ्यांनी छान चटकदार व चविष्ट पदार्थ विक्रीसाठी आणले होते. अभ्यासक्रमाचा ताणतणाव दूर करून आनंदनगरीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विरंगुळा मिळाला. आनंदनगरी मेळाव्याचे संयोजक गजानन साळवे व शिक्षक वृंदानी मेळाव्यासाठी मेहनत घेतली.