अपूर्वा पॉलिटेक्निक : ‘जल्लोष तरुणाईचा’ कार्यक्रमाला प्रतिसाद

अपूर्वा पॉलिटेक्निक : ‘जल्लोष तरुणाईचा’ कार्यक्रमाला प्रतिसाद

सेलू : श्रीराम प्रतिष्ठानचा रौप्य महोत्सव आणि सुरभी महोत्सव २०२४ निमित्त अपूर्वा पॉलीटेक्निक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या’जल्लोष तरुणाईचा’ कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

अध्यक्षस्थानी श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ.संजय रोडगे, उद्घाटक म्हणून आबासाहेब टरपले, प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.रवींद्र घोडके, विष्णू ढोले, संस्थेच्या सचिव डॉ. सविता रोडगे, डॉ.आदित्य रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्रा.महादेव साबळे, प्राचार्य प्रा.अशोक बोडखे, डॉ.नीलिमा सिंग, डॉ.मीनाक्षी रत्नपारखी, डॉ. बी.के.सोनवणे, प्रा. कार्तिक रत्नाला, प्रा. प्रगती क्षीरसागर, प्रा.अक्षय बन, कैलास ताठे, हरिभाऊ कांबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक प्राचार्य प्राध्यापक अशोक बोडखे यांनी केले. डॉ.संजय रोडगे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलतांना संस्थेने मागील २५ वर्षापासून केलेल्या विविध कामांची माहिती दिली तसेच भविष्यात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची देखील माहिती दिली. श्री टरपले यांनी श्रीराम प्रतिष्ठान येथे मिळणाऱ्या दर्जेदार शिक्षणाचे तोंड भरून कौतुक केले व भविष्यात संस्थेच्या पाठीमागे मोठ्या ताकदीने उभे राहू असे आश्वासन दिले.

या सांस्कृतिक कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी एकास सरस एक गीते सादर करून उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. सूत्रसंचालन प्राध्यापक गजानन जाधव व प्राध्यापक विनायक थिटे यांनी केले तर प्राध्यापक प्रदीप लहाने यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.


विनोद बोराडे : सिर्फ नाम ही काफी है…

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!