समर्पित आयोगाला कासार समाजाकडून निवेदन

ओबीसी आरक्षणाचे केले समर्थन

परभणी : महाराष्ट्र राज्यातील ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण पुन्हा लागू करण्यासाठी, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे, राज्य सरकारने गठीत केलेल्या समर्पित आयोगाला, महाराष्ट्र राज्यातील कासार समाजाच्यावतीने रविवारी (२२ मे) औरंगाबाद येथे निवेदन सादर करण्यात आले.
आयोगाच्या औरंगाबाद येथील दौऱ्यादरम्यान विभागीय कार्यालयात, सकाळी साडेनऊ ते साडेअकरा दरम्यान जनसुनावणी झाली. या वेळी आयोगाचे प्रमुख बांठिया व सदस्यांनी कासार समाजाचे म्हणणे जाणून घेत, निवेदन स्वीकारले. अखिल भारतीय सोमवंशी क्षत्रिय कासार समाजोन्नती मंडळाचे अध्यक्ष शरद भांडेकर, अरुण वेळापुरे, गोविंद अंधारे, ॲड. योगेश अक्कर, प्रा.पुरुषोत्तम शिनगारे व पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कासार समाजास मिळालेल्या प्रतिनिधीत्वाचे प्रमाण अत्यल्प आहे. योग्य व प्रमाणशीर प्रतिनिधीत्व मिळण्यासाठी आरक्षण पूर्ववत होणे आवश्यक आहे. कासार समाजाचे विधी मंडळ व संसदेमध्ये प्रतिनिधीत्व नाही. त्यामुळे समाजाचे प्रश्न सुटत नाहीत. म्हणूनच कासार समाजाला योग्य लाभ मिळण्यासाठी ओबीसी राजकीय आरक्षणाची आवश्यकता आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!