सावित्रीच्या लेकींकडून शिक्षणाचा जागर
सेलू/परभणी : सेलू तालुक्यातील स्वराज्य शिक्षण प्रसारक मंडळाच्या नितिन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील पाचवी ते सातवीतील १३ विद्यार्थिनींनी शुक्रवारी, ३ जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त शिक्षणाचा जागर घातला.
अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सर्जेराव लहाने होते. याप्रसंगी संचालक मुकुंद राजेंद्र लहाने, सुरेखा आहेरकर, राजेभाऊ चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले.
या वेळी सावित्रीबाई यांच्या वेशभुषेत अमृता लहाने, प्रतीक्षा शिंगारे, अनुष्का घोडे, प्रतीक्षा साखरे, वैष्णवी लहाने, प्रीती बोचरे
आरती लहाने, सोनाली लहाने, गीता लहाने या विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील प्रसंग सादर करून शिक्षणाचे महत्त्व सांगितले. लेक शिकवा, देश वाचवा, असा संदेश दिला. या वेळी आहेरकर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन व कार्यावर प्रकाश टाकला. तर प्रास्ताविक कैलास चोकनफळे यांनी केले. भगवान पवार यांनी आभार मानले.