क्रांतीज्योती सावित्राबाई फुले जयंती : आहेरबोरगावच्या स्वामी विवेकानंद ग्रंथालयात कार्यक्रम
सेलू : आहेर बोरगाव येथील स्वामी विवेकानंद ग्रंथालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन आणि महिला मुक्ती दिन म्हणून साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मुकुंद राजेंद्र लहाने होते. याप्रसंगी सचिव शिवाजी काळे, ग्रंथपाल लक्ष्मण मोगरे गंगाधर आवचार, सुरेंद्र दिशागत, पांडुरंग लाडाणे, भगवान पवार, राजाभाऊ चव्हाण, विष्णू आंधळे, कैलास चोकनपळे, आबासाहेब बिडवे, , प्राध्यापक हनुमान वाघ यांची उपस्थिती होती. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर श्री. दिशागत , श्री आवचार आदींनी आपले विचार मांडले. सूत्रसंचालन लक्ष्मण मोगरे यांनी केले. तर आभार प्रदर्शन श्री.काळे यांनी केले. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.