ज्ञानसाधनामध्ये सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात

ज्ञानसाधनामध्ये सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात

परभणी : धर्मापुरी पाटी येथील रायरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालया शुक्रवारी तीन जानेवारीरोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्रा. किरण सोनटक्केहोते. यावेळी संस्थेच्या सचिव प्राचार्या शितल सोनटक्के यांची विशेष उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. या कार्यक्रमानिमित्त ज्ञानसाधना सुरसागर संच यांच्याकडून स्वागत गीत व सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर आधारित प्रेरक गीते गायन करून सुरुवात करण्यात आली. या वेळी मान्यवरांनी सर्व विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केले.  सूत्रसंचालन श्री.डोंबे यांनी केले. प्रास्ताविक श्री खपरले यांनी केले. तर आभार प्रदर्शन श्री.जोशी यांनी मानले. या वेळी चौथी ते आठवी सेमी विभागातील सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!