इंग्रजी विषयाची कार्यशाळा उत्साहात

इंग्रजी विषयाची कार्यशाळा उत्साहात

सेलू तालुक्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांचा सहभाग

इंग्रजी विषयाची कार्यशाळा उत्साहात

सेलू/परभणी : येथील श्री केशवराव बाबासाहेब विद्यालयात एक दिवसाची इयत्ता १०  वी च्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी विषयाची कार्यशाळा सोमवारी, ६ जानेवारीरोजी आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेचे उद्घाटन शाळेचे संचालक मंडळ सदस्य डॉ.प्रवीण जोग, केंद्र प्रमुख एकनाथ जाधव तसेच परभणी जिल्हा इंग्लिश विषयाचे समन्वयक धनंजय भागवत, मुख्याध्यापक सिद्धार्थ एडके, जोशी,  विजय आवचार, अभिमान पाईकराव आदींच्या प्रमुख उपस्थितीत झाले. कार्यशाळेत श्री केशवराज बाबासाहेब विद्यालय, न्यू हायस्कूल, शारदा विद्यालय, नितीन माध्यमिक विद्यालय, आहेर बोरगाव, अनुसूचित जाती निवासी शाळा, पावडे हादगाव आदी शाळांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यशाळेत इंग्रजी विषयाची प्रश्नपत्रिकेचे स्वरूप व ती कशी सोडवायची याविषयी सविस्तर मार्गदर्शन विजय आवचार, सिद्धार्थ एडके, अभिमान पाईकराव व धनंजय भागवत यांनी केले. सूत्रसंचालन जयश्री सोन्नेकर यांनी केले. कार्यशाळेसाठी श्री. क्षीरसागर, संदीप जोशी, अण्णासाहेब गायकवाड, विठ्ठल काळे, बाबासाहेब बदाले यांनी सहकार्य केले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!