पत्रकारांनी आपली लेखणी विकासाभिमुख करावी : हेमंतराव आडळकर

पत्रकारांनी आपली लेखणी विकासाभिमुख करावी : हेमंतराव आडळकर

दर्पण दिनानिमित्त साईबाबा बॅंकतर्फे सेलूतील पत्रकारांचा सत्कार

श्री हेमंतराव आडळकर म्हणाले, की लोकशाहीमध्ये पत्रकाराचे स्थान अभेद्य आहे. दर्पण या नावातच सर्वकाही आहे. आज खूप प्रश्न आहेत. काळाच्या ओघात पत्रकारितेचे स्वरूप बदलले आहे. तंत्रज्ञानाने वाढलेली व्याप्ती बदलाचे कारण आहे. याही परिस्थितीत आपल्या लेखणीतून पत्रकार समाजातील वास्तव पुढे आणू शकतो. आपल्या तालुक्यात लोअर दुधना धरण होऊनही काही फायदा झालेला नाही. त्याचा योग्य उपयोग शेतकऱ्यांना मिळालेला नाही. या बद्दल पत्रकारांनी आपल्या लेखणीतून सरकारसमोर आणावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

सेलू/परभणी : पत्रकारांनी आपली लेखणी विकासाभिमुख करावी, असे मत साईबाबा बॅंकेचे अध्यक्ष हेमंतराव आडळकर यांनी व्यक्त केले.
मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती आणि दर्पण दिनानिमित्त साईबाबा नागरी बँकेच्या वतीने शहरातील सर्व पत्रकार बांधवाचा तसेच वृत्तपत्र विक्रेत्यांचा भेट वस्तू देऊन सन्मान करण्यात आला. त्यावेळी श्री.आडळकर बोलत होते. व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष पवन आडळकर, उपाध्यक्ष चंदशेखर मुळावेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी रामराव लाडाणे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

श्री आडळकर म्हणाले, की लोकशाहीमध्ये पत्रकाराचे स्थान अभेद्य आहे. दर्पण या नावातच सर्वकाही आहे. आज खूप प्रश्न आहेत. काळाच्या ओघात पत्रकारितेचे स्वरूप बदलेल आहे. तंत्रज्ञानाने वाढलेली व्याप्ती बदलाचे कारण आहे. याही परिस्थितीत आपल्या लेखणीतून पत्रकार समाजातील वास्तव पुढे आणू शकतो. आपल्या तालुक्यात लोअर दुधना धरण होऊनही काही फायदा झालेला नाही. त्याचा योग्य उपयोग शेतकऱ्यांना मिळालेला नाही. या बद्दल पत्रकारांनी आपल्या लेखणीतून सरकारसमोर आणावे. श्री.आडळकर यांनी पत्रकारांचे बँकेला असलेले सहकार्य स्पष्ट करून दर्पण दिनाच्या सर्व पत्रकारांना शुभेच्छा दिल्या.

प्रास्ताविकात श्री.लाडाणे यांनी बँकेच्या वतीने दरवर्षी राबवण्यात येत असलेल्या विविध सामाजिक उपक्रमाची माहिती देऊन बँकेचा लेखा जोखा सादर केला.पत्रकाराच्या वतीने डॉ.विलास मोरे व मोहसीन मामु यांनी मनोगतात बँकेच्या या उपक्रमाबद्दल आभार व्यक्त केले. तसेच पत्रकारांना वेळोवेळी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष हुगे यांनी केले.

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!