सेलू पोलिस ठाण्यात पत्रकारांचा सत्कार
सेलू : सेलू पोलीस ठाणे यांच्या वतीने दर्पण दिनानिमित्त सर्व पत्रकार बांधवाचा सोमवारी, ६ जानेवारीरोजी सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर पोलीस निरीक्षक दीपक बोरसे, सहायक पोलिस निरीक्षक प्रभाकर कवाळे, अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष लक्ष्मण बागल , व्हाईस ऑफ मीडियाचे अध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी यांची उपस्थिती होती. सहायक पोलिस निरीक्षक प्रभाकर कवाळे यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमा मागील उद्देश स्पष्ट केला.
यावेळी पत्रकारांच्या वतीने राम सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. पत्रकार हा समाज मनाचा आरसा असतो. जनमत बदलाची ताकद पत्रकाराच्या लेखणीत आहे. सध्या स्पर्धेचे युग असून लवकर बातमी लागण्यासाठी देखील स्पर्धा असते. परंतु पत्रकारांनी बातमी देतांना सत्यता पडताळून पाहणे गरजेचे आहे, असे विचार पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांनी व्यक्त केले. पत्रकार व पोलीस यांचा योग्य समन्वय असणे देखील गरजेचे आहे. असेही यावेळी बोरसे यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी पत्रकारितेचे जनक असलेल्या बाळशास्त्री जांभेकर यांचा सविस्तर परिचय दिला. सूत्रसंचालन मोहसीन अहमद यांनी केले.