नोकरीचे आमिष दाखवून ११ लाखांची फसवणूक
सेलूमध्ये चार जणांविरूद्ध गुन्हा
परभणी : मुलाला नोकरीचे आमीष दाखवून ११ लाख रूपये घेत फसवणूक केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे वडीलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संस्थाचालकासह चार जणांविरूद्ध सेलू पोलिस ठाण्यात मंगळवारी, ७ जानेवारीरोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.आरोपींमध्ये मुकुंद श्रीरामपंत देशपांडे, संस्थाचालक, रा.छत्रपती संभाजीनगर), अतुल बाबुराव जत्ती, (वय ४८, रा.साखर कारखाना परीसर, पाथरी), सुदर्शन दत्तात्रय पांगरकर ( वय ४५ वर्षे, रा. परतूर), अमोल अरविंद हार्जुळे (वय ४२ वर्षे, रा.परतूर) यांचा समावेश आहे. या प्रकरणी लक्ष्मीकांत बापुराव राऊत (वय ६३ वर्षे, रा.राऊतमळा, परतूर जि.जालना) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, १८ डिसेंबर २०१८ ते १२ जुलै २०२३ या कालावधीत सेलू येथील साईबाबा अपंग व्यवसाय प्रशिक्षण शाळेत मुलगा अक्षय याला वसतीगृह अधीक्षक पदाची ऑर्डर देतो म्हणून आरोपींनी संगनमताने ११ लाख रूपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल झाला असून पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पुरी तपास करीत आहेत.