चाचा नेहरु बाल महोत्सावाचे परभणीत थाटात उद्घाटन
परभणी : परभणी येथील श्री शिवाजी महाविद्यालय क्रीडा संकुलात महिला व बालविकास विभाग, परभणी यांच्यावतीने आयोजित चाचा नेहरु बालमहोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते शुक्रवारी, १७ जानेवारी रोजी ध्वजारोहण, आकाशात बलून सोडून आणि दिपप्रज्वलनाने झाले. या वेळी श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब जाधव, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कैलास तिडके, उपममुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळे, पालिका उपायुक्त बबन तडवी, प्रकल्प अधिकारी मिलिंद वाघमारे, बालकल्याण समितीचे अध्यक्ष रवि कातनेश्वरकर, ए.व्ही.मनतकर उपस्थित होते. जीवनात शालेय शिक्षणाबरोबर खेळही महत्वाचा आहे, त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने खेळाच्या माध्यमातून विविध क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी या वेळी केले. तीन दिवसीय महोत्सवात मैदानी स्पर्धा, इनडोअर स्पर्धा आणि सांस्कृतिक स्पर्धांचे आय़ोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
फोटो – परभणी आयोजित चाचा नेहरु बालमहोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते शुक्रवारी झाले.
पूर्ण….