‘आकाश दर्शन’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

‘आकाश दर्शन’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

सेलूतील नूतन विद्यालयाचा उपक्रम

'आकाश दर्शन' उत्स्फूर्त प्रतिसाद

सेलू/परभणी : सेलू शहरातील नूतन विद्यालयात भूगोल दिनाच्या निमित्ताने ‘आकाशाशी जडले नाते’ उपक्रमांतर्गत ‘आकाश दर्शन ‘ला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाला शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सीताराम मंत्री, हवामान तज्ञ पंजाबराव डख, संस्थेचे उपाध्यक्ष डी.के.देशपांडेगुरुजी, दत्तराव पावडे यांची उपस्थिती होती. उपस्थितांना टेलिस्कोपच्या माध्यमातून चंद्र, गुरू, शनी, ग्रह व उपग्रह दाखविण्यात आले. पृथ्वीचा उपग्रह असलेल्या चंद्राला जवळून पाहताना त्यावरील विविध डाग, प्रकाशित भाग पाहून विद्यार्थी भारावून गेले. पंजाबराव डख यांनी वातावरण, हवामान बदल याविषयी माहिती दिली. मुख्याध्यापक संतोष पाटील, के. के.देशपांडे, पर्यवेक्षक रोहिदास मोगल, सामाजिक शास्त्र विभागप्रमुख सुधीर जोशी यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!