लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मूल्ये जपा
नूतन महाविद्यालयाच्या शिबिरात डॉ.सुरेश हिवाळे यांचे मत
सेलू : युवकांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ही लोकशाही मुल्य आपल्या जीवनात आचरणात आणावीत. यामुळे लोकशाही बळकट होईल. सोबतच युवकांचे भविष्यही उज्ज्वल होईल. असे प्रतिपादन नूतन विद्यालयातीलशिक्षकडॉ.सुरेश हिवाळे यांनी काजळी रोहिणा येथे आयोजित नूतन महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात शुक्रवारी, १७ जानेवारीरोजी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कार्यक्रमाधिकारी प्रा. महेश कुलकर्णी होते. ‘ युथ फॉर माय भारत युथ फॉर डिजिटल लिटरसी ‘ हा विषय असलेले राष्ट्रिय सेवा योजना शिबिर आयोजित करण्यात आले आहे.डॉ.सुरेश हिवाळे यांचे ‘ लोकशाही मूल्य संवर्धनात युवकांची भूमिका ‘ या विषयावर व्याख्यान झाले. डॉ.हिवाळे म्हणाले की, ‘ युवकांनी आपले ध्येय निश्चित करून जीवनाची वाटचाल करावी.आपली पाऊले ग्रंथालयाकडे वळवावीत. पुस्तके वाचावीत. सामाजिक माध्यमांचा वापर विवेक जागा ठेवून करावा. वेळ वाया घालवू नये. आपल्या अधिकारा सोबतच आपले कर्तव्य आणि जबाबदारी याची जाणीव सुद्धा युवकांनी ठेवली पाहिजे. ‘ असेही ते म्हणाले. सूत्रसंचालन नंदिनी शिंदे यांनी. तर आभार प्रदर्शन भक्ती फड या विद्यार्थीनीने केले. कार्यक्रमाधिकारी डॉ. सुरेश उगले, प्रा.विशाल पाटील, डॉ.शिवराज घुलेश्वर, डॉ. आर.जे.नाथानी, प्रा.शुभांगी नायकल यांची उपस्थिती होती