चाचा नेहरू बाल महोत्सव : समूहनृत्य स्पर्धेत बालविद्या विहारचे प्रशालेचे यश
परभणी : महिला व बाल विकास विभाग परभणी*द्वारे आयोजित चाचा नेहरू बाल महोत्सव (२०२४-२५) सांस्कृतिक स्पर्धा समूह नृत्य मुले- मुली (वय १२ ते १८) या वयोगटात समूह नृत्य स्पर्धेत बाल विद्या विहारच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला. या वेळी इतर अनेक उत्कृष्ट समूह नृत्यातील संघांना मागे सारत उत्कृष्ट सादरीकरण, अचूक टाइमिंग व दमदार परफॉर्मन्सच्या जोरावर या विद्यार्थ्यांनी आपल्या नृत्याच्या व अदाकारीने सर्व प्रेक्षकांची मने जिंकत पहिला क्रमांक पटकावला.
महिला आणि बालविकास विभागाच्या वतीने चाचा नेहरू बाल महोत्सवामध्ये दिनांक १७ ते १९ जानेवारी दरम्यान विद्यार्थ्यांसाठी चित्रकला तसेच विविध प्रकारच्या स्पर्धा, इनडोअर खेळ यांचा विद्यार्थ्यांनी आनंद लुटला. स्पर्धा घेण्यात आल्या.सर्व विजयी स्पर्धकांचा बक्षीस सन्मान सोहळा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मा.श्री कैलास तिडके व मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न झाला.यावेळी मोठ्या संख्येने प्रेक्षकांची उपस्थिती होती.
नृत्य संघाने मिळवलेल्या या यशाबद्दल बाल विद्यामंदिर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. एन.ए.झरकर साहेब, उपाध्यक्ष विलास पोहंडुळकर, सचिव डॉ.विवेक नावंदर,सर्व संचालक मंडळ सदस्य तसेच मुख्याध्यापक विनायक लोखंडे, विजयश्री कुलकर्णी, स्वाती कुलकर्णी, नृत्य शिक्षक तथा मार्गदर्शक सूरज, कौसडीकर,,गायकवाड सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले