ज्ञानसाधना पब्लिक स्कूलमध्ये क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन
परभणी : धर्मापुरीपाटी येथील ज्ञानसाधना प्रतिष्ठानच्या ज्ञानसाधना प्रतिष्ठान पब्लिक स्कूलमध्ये आयोजित क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन मंगळवारी, २१ जानेवारी रोजी झाले. अध्यक्षस्थानी राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिवसांभ सोनटक्के होते. याप्रसंगी गंगाबाई सोनटक्के, पी.व्ही.कदम, प्रा.थोरात, सावंत उपस्थित होते. सप्ताहात २७ जानेवारीपर्यंत विविध क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत.सर्व विद्यार्थ्यांना खेळाडूची शपथ सामायिक स्वरूपात देण्यात आली. या क्रीडा सप्ताह प्रकारामध्ये संगीत खुर्ची, लिंबू चमचा, बटाटा रेस, धावणे, कबड्डी, क्रिकेट, खो खो या खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी शिवसंग दादा सोनटक्के व सौ गंगाबाई सोनटक्के यांच्या हस्ते रिबीन कट करून लिंबू चमचा व संगीत खुर्ची या क्रीडा प्रकाराचे रितसर उद्घाटन करण्यात आले. सूत्रसंचालन प्रा.एन.वाय.पत्की यांनी केले.