जिजाऊ आयटीआयमध्ये राज्यस्तरीय प्रशिक्षण उत्साहात
परभणी : शहरातील पाथरी रोड परिसरात असलेल्या जिजाऊ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये तीन दिवसीय राज्यस्तरीय फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम प्रशिक्षण उत्साहात पार पडले. प्राचार्य ज्ञानेश्वर तरवटे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. मुख्य मार्गदर्शक म्हणून कैलास गुरव उपस्थित होते.
संस्थेमार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध कार्यक्रम आणि भविष्यातील योजनांची माहिती देण्यात आली. संस्थेचे सचिव नितीन लोहट यांनी मार्गदर्शन केले. प्रशिक्षणासाठी एस.एल.जाधव, के.एम.कुलथे, एन.एन.चव्हाण, ए.एम.विभुते, एन.व्ही.चव्हाण, एस.आर.तरवटे, के.यु.वडमारे, राठोड यांनी सहकार्य केले.