परभणी : कायम स्वरुपी मुख्याधिकार्याची मागणी करीत, भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गुरुवारी ( २६ मे) सेलू नगरपालिका ‘सीओं’ च्या रिकाम्या खुर्चीला पुष्पहार घालून निषेध केला. गेल्या चार महिन्यांपासून पालिकेला मुख्याधिकारी नसल्याने, घरकूल योजना, नामांतर, बांधकाम परवान्याच्या शेकडो फाईल धूळखात पडून आहेत. येत्या चार दिवसांत नागरिकांची खोळंबलेली कामे पूर्ण करावीत; अन्यथा पालिकेला कुलूप ठोकण्याचा इशारा देण्यात आला आहे. जिल्हा उपाध्यक्ष जयसिंग शेळके, कपिल फुलारी, अशोक शेलार, गणेश ढेंगळे, गुड्डू दीक्षित, सुनील चव्हाण, राजू सोळंके, अर्जुन चव्हाण, सुमित चव्हाण, संजय चव्हाण, पवन पालवे आदींची उपस्थिती होती.
…