परभणी : सेलू येथील तक्षशिला प्रतिष्ठानतर्फे रविवारी (29 मे) साई नाट्य मंदिरात प्रथम उद्देश पूर्ण बुद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने सकाळी दहा वाजता भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून धम्म रॅली काढण्यात येणार आहे. बुद्ध वंदना, पंचशील धम्म ध्वजारोहण, धम्मदेशना होईल. परिषदेला पवन कुमार शिंदे व अतुल साळवे यांचे बुद्ध धम्मावर मार्गदर्शन होणार आहे. उद्घाटक म्हणून शरणानंद महाथेरो आणि प्रज्ञा बोधी यांची प्रमुख उपस्थिती असेल, स्वागताध्यक्ष ॲड.हर्षवर्धन सोनकांबळे आहेत. उपस्थित राहावे, असे आवाहन तक्षशिला प्रतिष्ठानचे गोवर्धन गायकवाड, विकास धापसे, महेंद्र नाटभजे आदींनी केले आहे.