सेलूतील शिबिरात ३०० जणांचे रक्तदान

सेलूतील शिबिरात ३०० जणांचे रक्तदान

पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते उद्घाटन,  सेलू तालुका केमिस्ट असोसिएशनचा पुढाकार

उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करतांना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या की, रक्तदान शिबीरे ही काळाची गरज असून सामाजिक उत्तरदायित्व म्हणून रक्तदान चळवळीत तरूणांनी पुढाकार घेतला पाहिजे. सेलू शहरात केमिस्ट भवन उभारणीसाठी सहकार्य करू अशी ग्वाही त्यांनी दिली.

सेलू / परभणी : अखिल भारतीय व महाराष्ट्र केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथअप्पा शिंदे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त सेलू तालूका केमिस्ट असोसिएशनच्या वतीने शुक्रवारी, २४ जानेवारीरोजी आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते झाले. शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला. सकाळी नऊ वाजल्यापासून शिबिराला सुरूवात झाली. ३०० जणांनी रक्तदान केले.

या वेळी माजी सभापती दिनकर वाघ, डॉ संजय रोडगे, ॲड.दत्तराव कदम, डॉ.ऋतुराज साडेगावकर, अशोक अंभोरे, शिवाजीराव खेडकर, सुंदरराव गाडेकर, नामदेव पांचाळ, अजय डासाळकर, संदीप टाक, केदार गजमल यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी मार्गदर्शन करतांना मंत्री बोर्डीकर म्हणाल्या की, रक्तदान शिबीरे ही काळाची गरज असून सामाजिक उत्तरदायित्व म्हणून रक्तदान चळवळीत तरूणांनी पुढाकार घेतला पाहिजे. सेलू शहरात केमिस्ट भवन उभारणीसाठी सहकार्य करू अशी ग्वाही त्यांनी दिली.

प्रास्ताविक तालुकाध्यक्ष संदीप टाक यांनी केले. सूत्रसंचालन सुभाष मोहकरे यांनी केले. कैलास काळे यांनी आभार मानले. रक्तसंकलनासाठी परभणी मेडीकल कॉलेजचे डॉ.राकेश शिंगदणे, दत्ता रासवे, रामा रेंगे, मंजेस खिल्लारे, तेजस पतंगे, आकाश भालेराव, विकास रहाटकर, मकरंद कुलकर्णी, जयश्री कांबळे, प्रतीक्षा कदम यांनी सहकार्य केले. शिबीराच्या यशस्वीतेसाठी सुनीलबापू डख, माणिकराव डख, शिवनारायण मालाणी, प्रेमराज चव्हाण, मुकेश खेडेकर, समीर नाईकवाडे, प्रवीण लोया, सतीश मुरकुटे, शौकत बागवान, शेख अमजद, गणेश साडेगावकर, लक्ष्मण पौळ, चंद्रकांत गटकळ, दीपक मंत्री, स्वप्नील जाधव , सोळंके, गबाळे, गात यांच्यासह मेडीकल असोसिएशनच्या पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!