पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण
परभणी : भारताचा ७६ वा प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम दि. २६ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ९.१५ वा. परभणी येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडीयम येथे होणार आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी १० मिनिटे अगोदर कार्यक्रमस्थळी राष्ट्रीय पोषाखात उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.