पंजाबचे शाही इमाम यांचे २६ जानेवारीला सेलूत व्याखान
सेलू : पंजाबचे शाही इमाम मौलाना उस्मान सहाब लुधियानावी यांचा भारताच्या स्वातंत्र्य लढाईत मूस्लीम समाजाचे योगदान तसेच धार्मिक विषयावर सेलू येथे २६ जानेवारीरोजी व्याख्यानाचे आठवडे बाजार परिसरात दुपारी दोन वाजात आयोजन करण्यात आले आहे. अध्यक्षस्थानी मूफती मोईजोदीन कासमी अमिर शरीयत (मराठवाडा) राहणार आहे. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजक मोहम्मद याहिया खॉन, सय्यद इम्रान हाशमी व जमाते ऊलमा इक्राम व आयोजकांनी केले आहे.