श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात 

श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात 

स्नेहसंमेलन म्हणजे विद्यार्थ्यांचा आनंदोत्सव : प्रा नागेश कान्हेकर

सेलू : शाळेमधून साजरे केले जाणारे वार्षिक स्नेहसंमेलन म्हणजे विद्यार्थ्यांसाठी आनंदोत्सव असतो.वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी वर्षभर केलेल्या मेहनतीचा परिपाक असतो. विद्यार्थी घडवण्याचे खरे कार्य प्राथमिक शिक्षकांच्या हातून होते त्यामुळे त्यांचेही कार्य मोलाचे असते असे प्रतिपादन नूतन महाविद्यालयाचे सेवानिवृत्त पर्यवेक्षक तथा जेष्ठ क्रीडा मार्गदर्शक प्रा.नागेश कान्हेकर यांनी केले.

येथील श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष ऍड.अनिरुद्ध जोशी होते तर व्यासपीठावर संस्थेचे सचिव महेशराव खारकर, मुख्याध्यापक सिद्धार्थ एडके, मुख्याध्यापक बी.यु.हळणे आदींची उपस्थिती होती. यावेळी शाळेच्यावतीने अयोजित जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती परीक्षा, रंगभरण स्पर्धा तसेच विविध स्पर्धा परीक्षा तसेच वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त घेतलेल्या स्पर्धेतील विजयी विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.

सकाळ सत्रात आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून शाळेच्या माजी मुख्याध्यापिका ए.यु.हिवाळे या होत्या तर अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष ऍड.अनिरुद्ध जोशी,व्यासपीठावर संस्थेचे सदस्य विष्णूपंत शेरे,निवृत्त मुख्याध्यापक पी एस कौसडीकर आदींची उपस्थिती होती.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुंदन नरेश पाटील,सारक्षा प्रशांत जगताप या विद्यार्थ्यांनी केले तर आभार नामदेव क्षीरसागर यांनी मानले. माजी मुख्याध्यापिका ए.यु.हिवाळे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.

अध्यक्षीय समारोपात ऍड.अनिरुद्ध जोशी यांनी विद्यार्थ्यांनी जीवनात सर्वच क्षेत्रात पूढे जाण्यासाठी धडपड करावी आणि आपले आयुष्य यशस्वी बनवावे असे आवाहन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपाली कुरुडे तर आभार किशोर खारकर यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!