विभागीय विज्ञान प्रदर्शनात प्रॉस्परस पब्लिक स्कूलचे यश
सेलू : छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएम संस्थेच्या वतीने आयोजित विभागीय विज्ञान प्रदर्शनात प्रॉस्परस पब्लिक स्कूलने व्दितीय क्रमांक पटकावून यश मिळवले आहे.
शाळेच्या कार्तिक शिंदे आणि भागवत कदम या विद्यार्थ्यांनी ‘सायकल जनरेटर’ हा प्रोजेक्ट सादर केला. या प्रकल्पासाठी सारिका ताठे यांनी मार्गदर्शन केले. या उल्लेखनीय यशाबद्दल श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ.संजय रोडगे, सचिव डॉ. सविता रोडगे आणि मुख्याध्यापक प्रगती क्षीरसागर यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन केले.