सेलूच्या स्वस्ति कालाचा राज्यपालांच्या हस्ते गौरव

सेलूच्या स्वस्ति कालाचा राज्यपालांच्या हस्ते गौरव

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दोन लाखांचे पारितोषिक, बाहेती बिहाणी नूतन इंग्लिश शाळेच्या लौकिकात भर 

सेलू/परभणी : राज्य सरकारच्या वतीने श्री भगवान महावीर स्वामी निर्वाण महोत्सव समितीतर्फे आयोजित महावीर स्वामी जीवन चरित्रावर आधारित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत सेलू (जि.परभणी) येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या बाहेती बिहाणी नूतन इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी स्वस्ति जिनेशजी काला हीने २ लाख २२ हजार २२२ रूपयांचे रोख पारितोषिक मिळविले आहे. रविवारी, दोन फेब्रुवारी रोजी राजभवनात आयोजित कार्यक्रमात राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या हस्ते स्वस्तिचा पारितोषिक धनादेश व सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला.पा रितोषिक वितरण सोहळ्याला कौशल्या विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार चैनसुखजी संचेती, ललितजी गांधी, हितेशभाई मोता आदींची प्रमुख उपस्थिती होती.

निबंध स्पर्धेत स्वस्ति काला हीने राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक मिळवला आहे. स्वस्तिचे आईवडील पायल व जिनेश प्रकाशचंदजी, आजी-आजोबा अनिता व विशाल सुभाषचंदजी काला, शाळेचे प्रशासकीय अधिकारी भुजंग देऊळगावकर, शिक्षक अमोल जाधव यांची कौतुक सोहळ्याला उपस्थिती होती. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया, उपाध्यक्ष डी.के.देशपांडे, सचिव प्राचार्य डॉ.व्ही.के.कोठेकर, सहसचिव जयप्रकाशजी बिहाणी, नंदकिशोरजी बाहेती, सीतारामजी मंत्री, दत्तराव पावडे, मकरंद दिग्रसकर, प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, प्राचार्य एन.पी.पाटील, भुषण देऊळगावकर आदींसह विविधस्तरांतून स्वस्तिचे अभिनंदन होत आहे.

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!