सामाजिक उपक्रमात अग्रेसर व्यक्तीमत्व सुरेखा शेवाळे-टाले

सामाजिक उपक्रमात अग्रेसर व्यक्तीमत्व सुरेखा शेवाळे-टाले

सामाजिक कार्यासह राजकारणात उमटवला ठसा

लेखक – गुणीरत्न वाकोडे, जिंतूर 

मातृभूमी असलेल्या जिंतूरात सामाजिक कार्याची शैक्षणिक जीवनापासून आवड असणाऱ्या सुरेखा शेवाळे-टाले यांनी राजकारणातसुद्धा सुरेख असा आपला वेगळा आगळा ठसा उमटवत पुढे पाऊल ठेवलेले दिसत असून शिवसेना उबाठा गटाच्या त्या महिला जिल्हा संघटक म्हणून जबाबदारीने काम पाहत आहेत. पूर्वीपासूनच संघटन कौशल्य हा गुण अंगी असल्याने पक्षानेसुद्धा त्यांची संघटकपदी निवड केलेली आहे. आणि संघटक या महत्वाच्या पदाची जवाबदरीची जाण ठेवून त्यांनी बहुतांश महिलांचे जिल्हाभर जाळ विणून उबाठा गटात जास्तीत जास्त महिलांचे मजबूत संघटन उभे करत शिवसेना उबाठा पक्षाची स्थिती मजबूत केली.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी अथक परिश्रम घेत परभणी जिल्ह्यासह जालना जिल्ह्यातील बहुतांश मतदारसंघात जोरदारपणे प्रचाराची धुरा सांभाळत खा.संजय उर्फ बंडू बॉस यांचा भरघोस मताने विजय होऊन परभणी लोकसभा मतदारसंघ पुन्हा एकदा उद्धव ठाकरे गटाच्या पाठीशी नेहमीप्रमाणे भक्कमपणे उभा राहिलेला दिसून आला.

सुरेखा टाले यांचे सामाजिक उपक्रम

सुरेखा टाले यांनी वृद्धाश्रमामध्ये वृद्ध महिलांसाठी अनेक सामाजिक उपक्रम राबविले तसेच ग्रामीण भागातील शाळकरी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करणे तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहाता कामा नये. यासाठी सायकलीचे सुद्धा वाटप केले. महात्मा बसवेश्वर जयंती उत्सवाचे तालुका प्रतिनिधीत्व करत सहभाग नोंदवीत पुढाकार घेतला. शहरी व रस्त्यातील काही रखडलेल्या विकास कामासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे. जिंतूर शहरात सणासुदीला नेहमीच वीज खंडित होते तसेच ग्रामीण भागातील वीज खंडित झाल्यामुळे शेतकरी वर्गाचे नुकसान होते. त्यांना वीज सुरळीत पुरवठा व्हावा, यासाठी प्रशासनाला वेळोवेळी निवेदने देऊन जबाबदारी पार पाडली. बाळंतीण महिलेला बँक अधिकाऱ्याकडून दिलेल्या त्रासाबद्दल जाब विचारणे व त्यांना योग्य न्याय मिळवून देणे, मुस्लिम समाजातर्फे आयोजित भव्य रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवणे, आनंदाची शिधा वेळेवर गरजूंना मिळवून देणे.  ढगफुटीमुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीचा योग्य व तत्काळ मोबदला भेटावा यासाठी वेळोवेळी प्रशासनास जाग आणून देण्याचे काम त्यांनी केले. बदलापूर येथील लहान चार वर्षाच्या मुलीवर नराधमाने अत्याचार केल्याचा प्रकार घडला. या अमानवीय घटनेचा धिक्कार करण्यासाठी मूक मोर्चाचे आयोजन, मयत संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना तत्काळ योग्य न्याय भेटावा व दोषींना शिक्षा व्हावी याचा निषेध नोंदवत देशमुख कुटूंबाची भेट घेत सांत्वन केले.
जागतिक दिव्यांग दिनानिमित्त तालुकास्तरावर नगरपालिका प्रशासनातर्फे आयोजित कार्यक्रमास सहभाग नोंदवून उपस्थित दिव्यांगांना योग्य असे मार्गदर्शन करत वेळोवेळी संबोधित करण्याचे काम त्यांनी केले.
शहरी व ग्रामीण भागातील बऱ्याच गरजू कुटुंबाना आवश्यक मदत करणे. त्यांचे गंभीर प्रश्न सोडवण्यासाठी वेळोवेळी पुढाकार घेत प्रशासन व लाभार्थ्यांसाठी मोलाची भूमिका पार पडण्याचे काम सुरेखा (शेवाळे) टाले ह्या नेहमी करत आलेल्या आहेत.
नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सर्वसामान्यांत दिनदर्शिकेचे मोफत वाटप अशा विविध,सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम राबणाऱ्या व सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या सुरेखा (शेवाळे) टाले यांचा आज ४ फेब्रुवारी रोजी वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांना लाख ! लाख!! मंगलमय शुभेच्छा !!!

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!