शासनाच्या विविध पुरस्कारांसाठी 15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज आमंत्रित

शासनाच्या विविध पुरस्कारांसाठी 15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज आमंत्रित

परभणी, दि.७ : सामाजिक न्याय विभागामार्फत सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्ती व स्वयंसेवी संस्थांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी पुरस्कार देऊन गौरविण्यात येतात. त्याअनुषंगाने इच्छुक व पात्रताधारक व्यक्ती व संस्थानी दि. 15 फेब्रुवारी 2025 पर्यंत अर्ज सादर करावे, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त यांनी केले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार, पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार, संत रविदास पुरस्कार, शाहू, फुले, आंबेडकर पारितोषिक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना सन्मानपूर्वक गौरविण्यात येतो. याबाबत शासनाने सन 2023-24 वर्षासाठी पात्र व्यक्ती, संस्था यांनी सहा पुरस्कारांचे अर्ज प्राप्त चेकलिस्टनुसार प्रस्ताव तयार करुन तीन प्रतीमध्ये सहायक आयुक्त, समाज कल्याण, परभणी यांचे कार्यालयात विहित मुदतीत सादर करावेत. सदर अर्ज शासनाचे संकेतस्थळ https//sjsa.maharashtra.gov.in वर उपलब्ध आहेत. तसेच पात्रतेचे निकष, अटी, शर्ती संदर्भातील माहितीसाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाकडे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!