विद्युत पंप खरेदीसाठी 10 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

विद्युत पंप खरेदीसाठी 10 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

परभणी, दि.७ : कृषि विभाग जिल्हा परिषदतर्फे जिल्हा परिषद उपकर योजना सन 2024-25 मध्ये 50 टक्के अनुदानावर विद्युत पंप खरेदी करण्यासाठी योजनेस मान्यता मिळाली आहे. त्यामुळे गरजू व पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पंचायत समिती स्तरावर 10 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गरजू व पात्र शेतकऱ्यांनी विहित नमुन्यातील अर्जासोबत सातबारा व होल्डींग, (विद्युत पंपासाठी ७/१२ वर विहिरीची नोंद आवश्यक), विद्युत पंपासाठी विद्युत जोडणी असलेला पुरावा (विद्युत बील/कोटेशनची झेरॉक्स), बँक खाते क्रमांक व आयएफएससी कोड दर्शविलेल्या पासबुकच्या प्रथम पानाची झेरॉक्स आणि आधारकार्ड झेरॉक्स प्रतींसह तयार प्रस्ताव गट विकास अधिकारी पंचायत समिती कार्यालयास सादर करावेत. प्राप्त प्रस्तावाची छाननी करून अंतिम मान्यतेनंतर निवड झालेल्या शेतकऱ्यांना कार्यालयाकडून विद्युत पंप खरेदीसाठी पूर्वसंमती देण्यात येईल. पूर्वसंमती मिळालेल्या लाभार्थ्यांनी विहित मुदतीत खरेदी करून खरेदी बिल गट विकास अधिकारी यांच्याकडे सादर करावे लागेल. त्यानंतर खरेदी केलेल्या विद्युत पंपाची तपासणी केल्यानंतर 50 टक्के अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा केले जाईल.

जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी विहित मुदतीत विहित नमुन्यात आवश्यक त्या कागदपत्रांसह पंचायत समितीला अर्ज सादर करावेत, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी तनिषा माथुर तसेच कृषि विकास अधिकारी जिल्हा परिषद परभणी यांनी केले आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!