नूतन प्राथमिक शाळेच्या बालवाड्यांचे स्नेहसंमेलन उत्साहात
मुलांची आवड ओळखून शिक्षण द्या : डॉ.सुर्वणा नाईकनवरे
सेलू : येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्था सेलू संचालित नूतन पूर्व प्राथमिक विभागाच्या बालवाड्यांचे स्नेहसंमेलन उत्साहात साजरे झाले.
अध्यक्षस्थानी राजेशजी गुप्ता होते. प्रमुख पाहुण्या म्हणून स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.सौ.सुवर्णा अशोक नाईकनवरे काळे होत्या. संस्था अध्यक्ष डॉ.सत्यनारायणजी लोया, मकरंद दिग्रसकर, मुख्याध्यापक सुखानंद बेंडसुरे, रमेश काळे, पर्यवेक्षिका श्रीमती छाया बोबडे, पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा आरती काळे आदीची उपस्थिती होती. पर्यवेक्षिका बोबडे यांनी प्रास्ताविक केले. सुनिता देवकर यांनी वार्षिक अहवालाचे वाचन केले, पाहुण्यांचा परिचय अनुपमा नाटकर यांनी करुन दिला. चिमुकल्यांच्या स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरूवात झाली. यावेळी डॉ.काळे म्हणाल्या की, ‘पालकांनी आपल्या लहान मुलांच्या संस्कार व शिक्षणाकडे लक्ष देऊन त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देवून संधी उपलब्ध करून द्यावी ‘.पाहुण्यांच्या हस्ते महिला पालक स्पर्धा, विद्यार्थ्यी गुणवत्ता पारितोषिक व विविध क्रीडा स्पर्धा व अभिनयातील बक्षिसांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनिषा बायस यांनी केले. आभार संध्या कुलकर्णी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी बालवाडीताई व बालवाडी सेविका तसेच पालकांचे सहकार्य लाभले.