38 वी राष्ट्रीय टेबल टेनिस क्रीडा स्पर्धा : महाराष्ट्राचा महिला संघ उपांत्य फेरीत
डेहराडून : ३८ वी नॅशनल गेम्स उत्तराखंड टेबल टेनिस क्रीडा स्पर्धेत गट अ मध्ये महाराष्ट्र , दिल्ली, उत्तराखंड, तामिळनाडू साखळी सामन्यात पहिला महिला गटात सामना महाराष्ट्र विरुद्ध दिल्ली महाराष्ट्र संघाने 3-0 सेट मध्ये विजय प्राप्त केला.
यात तनिशा कोटेचा वि. गरीमा गोयल चा 11-5,11-5,11-6 सरळ सेटमध्ये पराभव केला.
सायली वाणी वि. लक्षिजा नारंग हिचा 11-8,11-5, 9-11,11-5 अशा सेट मध्ये 3-1 विजयी ठरली. तिसऱ्या सेट कर्णधार दिया चितळे वि. वनशिखा बार्गे दरम्यान 12-10,11-8,11-9 सरळ 3-0 सेट विजयी सलामी दिली. पुरुष ब गटात महाराष्ट्र, वेस्ट बंगाल, उत्तराखंड, दिल्ली साखळी सामन्यात पहिला सामना. महाराष्ट्र वि. वेस्ट बंगाल दरम्यान दिपीत पाटील वि. आकाश पाल दरम्यान 11-7,3-11, 11-8, 13-11,11-8 अशा अतितटी चुरशीची लढत होऊन महाराष्ट्र च्या दिपीत पाटील यांनी 3-2 सेट मध्ये सामना जिंकला. दुसरा सेट रेगन अल्बुकर्क वि. अनिरभान घोष दरम्यान 13-11,11-7,11-6 सरळ 3-0 सेट ने मात केली. तिसरा सेट यश मोदी वि. अनिकेत सेन दरम्यान9-11,11-9,9-11,
11-8,11-8, अतितटी लढतीत 3-2 सेट मध्ये महाराष्ट्र विजयी ठरला.महिला गटातील दुसरा सामना महाराष्ट्र वि. तामिळनाडू दरम्यान
तनिषा कोटेचा वि. काव्यश्री बस 8-11,12-10,11-5, 2-11,11-4, 3-2 सेट मध्ये डाव जिंकला. दिया चितळे वि. सेलेना एस दरम्यान 11-9,11-3,11-8 सरळ सेट मध्ये डाव जिंकला. रिथ रिशा टेनिसन वि मानिनी शिवास,5-11,11-8,11-9 5-11,8-11, हा डाव तामिळनाडू
तनिषा कोटेचा वि. सेलेना एस दरम्यान 10-11,4-11,15-13,11-7,11-7, अशा चुरशीची लढत देऊन तनिषा कोटेचा महाराष्ट्र सामना 3-1सेट मध्ये जिंकला.
पुरुष गटात दुसरा सामना
महाराष्ट्र वि उत्तराखंड दरम्यान महाराष्ट्र संघाच्या वतीने रेगन अल्बुकर्क वि. उत्तराखंड च्या सक्षम मितल11-3,11-3,11-3 सरळ सेट ने पराभूत केले.तर सिध्देश पांडे वि. गौतम ध्रुर्व यास 11-2,11-3,3-11,11-8, मध्ये 3-1 सेट विजयी झाला. जश मोदी वि. आकाश गुप्ता दरम्यान 11-5,11-3,11-4 मध्ये 3-0 सेट ने उत्तराखंड पराभूत केले.
महिला संघ महाराष्ट्र वि उत्तराखंड दरम्यान सायली वाणी वि. कर्ती पांडे 8-11,11-8,11-9,11-8 मध्ये 3-1 सामना जिंकला. स्वस्तिका घोष वि विदुषी दानी दरम्यान 11-8,11-9,11-7 अशा 3-0 सेट सामना जिंकला. तनिषा कोटेचा वि. अदितरी भारद्वाज दरम्यान 11-7,9-11,11-3,11-4 अशा 3-1 सेट विजयी होऊन महाराष्ट्र महिला संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला. महिला संघास आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक सुनील बाब्रास, पुरुष संघाचे राष्ट्रीय प्रशिक्षक महेंद्र चिपळूणकर संघ व्यवस्थापक म्हणून श्रीराम कोनकर, गणेश माळवे हे काम पाहत आहेत.