महागायत्री महायज्ञ सोहळ्यात हजारो भाविकांचा सहभाग

महागायत्री महायज्ञ सोहळ्यात हजारो भाविकांचा सहभाग

सर्वात्मक गुरुदेव परिवाराचा पुढाकार, टाकळी कुंभकर्ण येथील यज्ञभूमीवर सोहळा उत्साहात 

परभणी : सर्वात्मक गुरुदेव परिवाराचे गुरुदेव श्री.वचन माऊली यांच्या प्रेरणेने जिंतूर रस्त्यावरील टाकळी कुंभकर्ण (ता.जि.परभणी) येथील नियोजित आश्रमाच्या जागेवर रविवारी, ९ फेबु्वारी रोजी संत-महंत व ब्रह्मवृंदांसह ३१०५ यजमान व हजारो भाविकांच्या उपस्थितीत धार्मिक विधींसह मंत्रोच्चारात ३१०५ कुंडी महागायत्री महायज्ञ सोहळा उत्साहात पार पडला. शनिवारी धार्मिक विधींसह देवता, पुण्यवाचन व अग्निचीही स्थापना करण्यात आली. रविवारी सकाळी ८ वाजता सोहळ्यास प्रारंभ झाला. श्री गायत्री यज्ञ विधींचे पौराहित्य वेदशास्त्रसंपन्न प्र.य.नित्रुडकर गुरुजी, सुरेश महाराज उटीकर, माधवबुवा आजेगांवकर यांच्यासह अन्य ब्रम्हवृंदांनी केले. विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थितीत झाली. सुमारे दोन तास चाललेल्या या सोहळ्यात सपत्नीक यजमानांनी यज्ञ आहुती दिली. जगाचे कल्याण हे गायत्री मातेच्या उपासनेतच आहे. महागायत्री महायज्ञ सोहळ्याचे हे स्थळ या जिल्ह्याचे आध्यात्मिक उर्जा केंद्र व्हावे, अशी अपेक्षा गुरुदेव श्री.वचन माऊली यांनी या वेळी व्यक्त केली. महाप्रसादाने सोहळ्याची सांगता झाली. यज्ञ सोहळ्याच्या यशस्वीतेकरीता सर्वात्मक गुरुदेव परिवार, महागायत्री यज्ञ समिती आणि टाकळी कुंभकर्णी येथील शेकडो ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!