विविध क्षेत्रातील व्यक्तित्वांचा सेलूत सत्कार
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेचा उपक्रम
सेलू / परभणी : राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्ताने माजी आमदार हरिभाऊकाका लहाने यांच्या हस्ते सेलू शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तित्वांचा रविवारी यथोचित सत्कार करण्यात आला. यामध्ये संगीत क्षेत्रातील बंडू कान्हेकर, सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड, प्रसिद्ध “बाबा वडापावचे” संचालक महादेव बांगर, रुग्णवाहिका संचालक सचिन सावंगीकर, हमाल मापाडीच्या कार्यात योगदान देणारे दीपक शिंदे, बांधकाम क्षेत्रातील विशाल शेळेके यांचा समावेश आहे.
या वेळी कुणाल लहाने, संदीप लहाने, शिवसेना तालुकाप्रमुख बाबा काटकर, शहर प्रमुख पांडुरंग कावळे, उपजिल्हाप्रमुख पंडितअण्णा आरकुले, हरिभाऊ काळे, माजी नगरसेवक अविनाश शेरे, हनुमान गात, बंडू देवधर, रमेश मुसुरे, जिजाभाऊ सोळंके, छत्रगुण मगर, दत्तराव जाधव, अंकुशराव टाके, रामराव गायकवाड ,बालासाहेब चव्हाण, सुशांत मोगल, पांडुरंग सावंत आदीसह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी संतोष घोडके, विश्वजीत लिपणे, शुभम ताटे, अजय ठोके, विजय गायकवाड, जीवन लहाने, माऊली उगले, विनायक गायकवाड, संजय गायकवाड, मुंजा शिंदे ,अजय अवसरमल ,दीपक गायकवाड, लक्ष्मण कणसे, नारायण शिंदे, बाबा लोखंडे आदींनी शिवसेनेत पक्षात प्रवेश केला. त्यांचे स्वागत करण्यात आले.