पत्रकार अबरार बेग यांचा महाराष्ट्ररत्न पुरस्काराने गौरव 

पत्रकार अबरार बेग यांचा महाराष्ट्ररत्न पुरस्काराने गौरव 

सेलू : राष्ट्रीय एकात्मकताचे प्रतीक असलेल्या परभणीचे सुफीसंत हजरत सय्यद शाह तुरबुल हकक यांच्या उर्सानिमित जन सहयोग सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महेमूद खान यांच्या वतीने घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धा व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा कार्यगौरव सोहळा रविवारी, ९ फेब्रुवारीरोजी परभणी शहरातील मास्टर कॅफे हॉलमध्ये उत्साहात पार पडला. यावेळी पत्रकार क्षेत्रात उत्कृष्ट कार्याबद्दल सेलू येथिल ए स्टार न्यूज चॅनलचे संपादक पत्रकार अबरार बेग यांना महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी परभणी विधीतज्ञ अशोक सोनी, वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाच्या डॉ.नीता गायकवाड, एजाज फारूखी, शिवसेना नेते जलील पटेल, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, गफ्फार मास्टर, इंजीनियर जावेद शेख, पोलिस उपनिरीक्षक इरफान इनामदार, फरहानाज, सना एजुकेशन सोसायटीचे सचिव सय्यद मुजाहिद अली, सय्यद गौस मोहियोद्दीन, मोहम्मद सरफराज अहेमद, सय्यद शाकीर, फहीम काझी, ज्येष्ठ पत्रकार मदनबापू कोल्हे, सरफराज शेख, शाहीद सिद्दिकी, आदी मान्यवर उपस्थित होते. संयोजक महेमूद खान यांनी उपस्थित मान्यवरांचा स्वागत सत्कार केला.

वक्तृत्व स्पर्धेत परभणी शहरातील उर्दू शाळेतील ५०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. मान्यवरांच्या हस्ते सर्व विजेत्यांना पारितोषिके वितरित करण्यात आले. तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांना महारष्ट्र रत्न पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.या वेळी शहरातील विविध शाळेतील विद्यार्थी, मुख्याध्यापक, शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थीत होते. सूत्रसंचालन प्रा.अरूण पडघन, शिक्षक जावेद अन्सारी,असिफ, हुसेन अन्सारी यांनी केले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!