न्यू हायस्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

न्यू हायस्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

सेलू : येथील न्यू हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय, सेलू येथे इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभाचे ९ वीच्या विद्यार्थांनी आयोजन केले होते. कै.विनायकराव पाटील व सरस्वती प्रतिमेच्या पूजनाने कार्यक्रमास सुरुवात झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक के. व्ही. मोरे तसेच पर्यवेक्षक धनंजय भागवत, दिनकर नखाते शरद मगर, भाऊसाहेब निकम आदींची उपस्थिती होती. करिष्मा ढेंबरे या विद्यार्थिनीने स्वागत गीत गायले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामेश्वर गाडेकर यांनी केले. याप्रसंगी रेणुका ताठे, ज्ञानेश्वरी गडदे, मयुरी हजारे, प्रतिक्षा खरात व त्रिरत्न सावंत या विद्यार्थ्यांनीआपले मनोगत भाषणातून मांडले. तसेच एस.टी. नागरे, ए.एस.सावंत, जी.के. तोटेवाड, डी.सी.सोळंके, डी.एस. मोरे आदी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर के.व्ही. मोरे, धनंजय भागवत यांनी परीक्षेसंबंधी महत्वाच्या सूचना व परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रूपाली शिंदे केले, तर आभार जी.एस.रोंटेवाड यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नारायण काष्टे व विष्णू गजमल यांनी प्रयत्न केले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!