ज्ञानसाधनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त दुग्धाभिषेक
विविध कार्यक्रमांसह जल्लोषात मिरवणूक
परभणी : धर्मापुरी येथील ज्ञानसाधना प्रतिष्ठान संचालित ज्ञानसाधना कॉलेज ऑफ फार्मसी, रायरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय धर्मापुरी, ज्ञानसाधना कनिष्ठ महाविद्यालय, ज्ञानसाधना प्रतिष्ठान पब्लिक स्कूल, बळीराजा सन्मान योजना या सर्व विभागाच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५ व्या जयंतीनिमित्त बुधवारी, १९ फेब्रुवारीरोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास संस्थेचे अध्यक्ष प्रा.किरण सोनटक्के व सचिव प्रा.शितल सोनटक्के यांच्या हस्ते पंचामृतासह दुग्धाभिषेक करून महाराजांची सामुहिक आरती घेण्यात आली.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर ज्ञानसाधना सुर सागर गीत संच द्वारा जिजाऊ वंदना घेण्यात आली. फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजन्म पाळणा या गीतावर सुंदर असे नृत्य सादरीकरण केले.
या वेळी फार्मसी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी लेझीम पथकाच्या माध्यमातून सुंदर नृत्य सादरीकरण केले. तसेच विविध भितीपत्रकाचे सुद्धा विमोचन करण्यात आले. सृष्टी काळे व संच यांनी सुंदर असा छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित पोवाडा सादर केला. याप्रसंगी फार्मसी महाविद्यालयाचा विद्यार्थी अजिंक्य मोहिते हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषा मध्ये व विद्यार्थिनी कुमारी मधुरा धोपे ही राष्ट्रमाता जिजाऊ च्या वेशभूषा मध्ये कार्यक्रमाचे आकर्षण म्हणून शोभून दिसत होते.
बळीराजा सन्मान योजना विभागातील समृद्धी घाडगे, सानिका कल्याणकर, संपदा नादरे, वैष्णवी बनवटे यांनी शिवचरित्रावर सुंदर असे भाषण सादर केले. कांचन कल्याणकर , पौळ शशिकांत, भक्ती पोले यांनी मी भिमाची वाघीण मी शिवबाची रणरागिण , तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला या गीतांचे सादरीकरण केले. तसेच ज्ञानसाधना सेमी व फाउंडेशन विभागातील विद्यार्थिनी सुप्रिया शेळके , अर्णश तरटे, वाळेकर गौरी, समर्थ वाळेकर यांनी सुद्धा सुरेख असे शिवरायांच्या कार्यावर मनोगत सादर केले. तर पृथ्वीराज शिंदे,पृथ्वीराज सूर्यवंशी व पवन सामाले यांनी राज आल राज आल, शिवबा आमचा मल्हारी, मावळ आम्ही वादळ आम्हीं या सुंदर गीताचे सादरीकरण केले.
कार्यक्रमानंतर सर्व विद्यार्थी व शिक्षक वृंद यांच्या उपस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या आकर्षणीय देखाव्यासह मुख्य शाखा ते फार्मसी महाविद्यालय अशी भव्य मिरवणूक काढण्यात आली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस.एस.वाळके, एम.ई.पवार यांनी केले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. प्रा .किरण सोनटक्के (अध्यक्ष- ज्ञानसाधना प्रतिष्ठान परभणी) व कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी मा.प्रा .शीतल सोनटक्के मॅडम (सचिव- ज्ञानसाधना प्रतिष्ठान परभणी) हे उपस्थित होते. तर प्रमुख उपस्थितीमध्ये संस्थेतील सर्व समन्वयक , सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.समन्वयक,विभागप्रमुख ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.