SSC EXAM : अतिरिक्त परीक्षार्थींमुळे के.बा.विद्यालयात उपकेंद्राची व्यवस्था

SSC EXAM : अतिरिक्त परीक्षार्थींमुळे के.बा.विद्यालयात उपकेंद्राची व्यवस्था

सेलूतील न्यू हायस्कूल परीक्षा केंद्र : विद्यार्थ्यांनी नोंद घेण्याचे आवाहन

सेलू, दि.19 : येथील न्यू हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय ही शाळा 21 फेब्रुवारीपासून सुरू होणार्‍या एसएससी बोर्ड (इयत्ता दहावी) परीक्षेचे केंद्र आहे. बोर्डाला 250 विद्यार्थी संख्या मर्यादा कळवूनदेखील या परीक्षा केंद्रावर 400 परीक्षार्थीं संख्या नोंदवल्या गेल्यामुळे अतिरिक्त विद्यार्थ्यांसाठी जवळील श्री केशवराज बाबासाहेब (के.बा.) विद्यालय या उपकेंद्रावर परीक्षेची व्यवस्था करण्यात आली आहे. या उपकेंद्रावर उर्दू माध्यमाच्या 68 व इंग्रजी माध्यमाचे 24 असे एकूण 92 विद्यार्थ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. न्यू हायस्कूल परीक्षा केंद्रावर उर्दू व इंग्रजी माध्यमाच्या परिक्षार्थिच्या शाळा, विद्यार्थी व पालकांनी याची नोंद घ्यावी व विद्यार्थ्यांनी परीक्षेस वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन गटशिक्षणाधिकारी उमेश राऊत, केंद्र संचालक के.व्ही.मोरे व उपकेंद्राचे सहसंचालक धनंजय भागवत यांनी केले आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!