छत्रपती शिवरायांना एसटी कर्मचाऱ्यांकडून अभिवादन

छत्रपती शिवरायांना एसटी कर्मचाऱ्यांकडून अभिवादन

जिंतूर आगारातील एसटी कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप 

जिंतूर : छत्रपती शिवाज महाराज यांच्या जयंतीनिमित्त एसटी आगारातून ढोल ताशांच्या गजरात एसटी डेपो ते शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्या पर्यत शिस्तबद्ध पद्धतीने रॅली काढून अभिवादन करण्यात आले. तसेच कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्यात आली.

रॅलीतील सर्वांनी भगवे फेटे परिधान केले होते. तत्पूर्वी आगार व्यवस्थापक आनंद चव्हाण व स्थानक प्रमुख रामेश्वर सोनवणे यांच्या हस्ते एसटी कर्मचाऱ्यांच्या होतकरू पाल्याना शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले. मिरवणूक व अभिवादन प्रसंगी व्यवस्थापक आनंद चव्हाण, आगार प्रमुख रामेश्वर सोनवणे, वाहतूक निरीक्षक शरद पाटील, वाहन परीक्षक संजीव भांबळे, लेखाकार ज्ञानेश्वर पांचाळ, लिपिक गजानन चव्हाण, गुणीरत्न वाकोडे, माजी महिला कर्मचारी सुमनबाई घुगे, लता देशमुख, पाटील ताई, बंजारा युवा संघटनेचे अध्यक्ष रमेश आढे यांच्या सह सर्व कर्मचारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. अन्नधान्याच्या कार्यक्रमाने समारोप झाला.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!