सेलू शहरात शिवप्रतिष्ठानतर्फे ऐतिहासिक शिवजन्मोत्सव मिरवणूक
सेलू : सार्वजनिक शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने सेलू शहरात बुधवारी सायंकाळी शिवप्रतिष्ठान हिंदूस्थान संस्थेतर्फे भव्य ऐतिहासिक शिवजन्मोत्सव मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत कोल्हापूर येथील शांतीदूत मर्दानी आखाडा यांची यूद्धकलेचे प्रात्यक्षिके, संबळ पथक, हल्गी सम्राट पथक, स्थानिक हिंदू मूलींचे झांज-लेझीम-ध्वज पथक, बॅन्ड पथक व शिवछत्रपतींची मूर्ती, ग्रामदैवत बाबासाहेब महाराज यांची मूर्ती, विठ्ठल रखुमाई मूर्ती, महाकालेश्वर मूर्ती असे देखावे सादर करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज स्मारक शिवतीर्थ येथून ही मिरवणूक शहरातील मुख्य मार्गावर काढण्यात आली व शिवतीर्थ येथेच पोहोचली.
अत्यंत शिस्तबद्ध व पारंपारिक पद्धतीने मिरवणूक पार पडली. सेलू शहरातील शिवजन्मोत्सवाची ही ऐतिहासिक मिरवणूक ठरली.
समारोप प्रसंगी शिवछत्रपतींच्या जिवन चरित्रावरील जिवंत देखावा दाखवण्यात आला. या मध्ये हजारो हिंदूमाता भगिनींच्या व शिवभक्तांच्या वतीने शिवछत्रपतींच्या स्मारकाची सामूहिक आरती करण्यात आली. भव्य आतिषबाजीने या मिरवणुकीची सांगता करण्यात आली.