शिवजयंतीनिमित्त बाहेती बिहाणी इंग्लिश शाळेत विविध कार्यक्रम

शिवजयंतीनिमित्त बाहेती बिहाणी इंग्लिश शाळेत विविध कार्यक्रम

परभणी : सेलू् येथील बाहेती बिहाणी नूतन इंग्लिश स्कूलमध्ये बुधवारी शिवजयंतीनिमित्त राजमाता जिजाऊ व शिवबा वेशभूषा स्पर्धा, निबंध स्पर्धा, किल्ले व छायाचित्र प्रदर्शन आदींसह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
पालकांसाठी ‘जिजाऊ एक आदर्श माता’ व ‘जाणता राजा शिवछत्रपती’ या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली. राजमाता जिजाऊ व शिवबा फोटो स्पर्धा घेण्यात आली. विविध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा पूजनाने झाली. या वेळी नृत्य रूपात विद्यार्थ्यांनी शिवचरित्र सादर केले. नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.सत्यनारायणाची लोया, उपाध्यक्ष डी. के देशपांडे, सहचिटणीस जयप्रकाशजी बिहाणी, शालेय समितीचे अध्यक्ष पी.आय. बिनायके, कार्यकारणी सदस्य दत्तराव पावडे, नंदकिशोरजी बाहेती, प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

शिवजयंतीनिमित्त बाहेती बिहाणी इंग्लिश शाळेत विविध कार्यक्रम

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!