संत गजानन महाराज प्रगट दिन महोत्सव उत्साहात

संत गजानन महाराज प्रगट दिन महोत्सव उत्साहात

सेलूत कीर्तन, महाप्रसादासह विविध कार्यक्रम 

सेलू : स्वामी विवेकानंदनगर येथील श्री संत गजानन महाराज मंदिर समितीच्या वतीने प्रगट दिन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्त मंगळवार ते गुरुवार (१८ ते २० फेब्रुवारी) दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दररोज सकाळी ५ ते ८ या वेळेत श्री च्या मूर्तीस अभिषेक, ८ ते ११ यावेळेत श्री संत गजानन विजय या ग्रंथाचे पारायण झाले. या मध्ये महिला भाविकांचा सहभाग लक्षणीय होता.  दुपारी ३ ते ४ या वेळेत महिला मंडळाचे भजन झाले. २० फेब्रुवारी रोजी सकाळी साडेअकरा वाजता भागवताचार्य बाळू महाराज गिरगावकर यांचे काल्याचे कीर्तन झाले. या वेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. महाआरती झाली. महाप्रसादाने उत्सावाची सांगता झाली. या वेळी भाविकांनी कीर्तन, दर्शन आणि महाप्रसादासाठी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले. महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी मंदिर समिती व स्वामी विवेकानंद नगरातील नागरिकांनी  पुढाकार घेतला.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!