राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उपक्रम
परभणी : वर्गणी करून रेल्वे स्टेशन परिसरात मोफत शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करीत, प्रवाशांची तहान भागविणाऱ्या सेलूतील ऑटोरिक्षा चालकांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सन्मान करण्यात आला.
या वेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती अशोक काकडे, प्रफुल्ल गिल्डा, अशोक उफाडे, मजिद बागवान आदींची उपस्थिती होती. तहान आणि भूक ही सर्वांना सारखीच लागत असते. ती गरीब- श्रीमंत, लहान-थोर, किंवा उच- -निच असा भेद करीत नाही. तहान-भूक ज्यांना ओळखता आली ती माणसं खरी पुण्यवान असतात. गेल्या काही वर्षापासून सेलूतील रिक्षाचालक वर्गणी करून रेल्वे स्टेशन परिसरात पाणपोई चालवतात. तेथे मोफत शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे. हा पुण्याचा उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, असे मत सभापती अशोक काकडे यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केले. रिक्षाचालकांचे प्रश्न मार्गी लावण्याबाबत आश्वस्त केले. प्रातिनिधिक स्वरूपात रावसाहेब मुकणे यांचा सपत्नीक फेटा, शाल श्रीफळ आणि साडी चोळी देऊन सत्कार करण्यात आला. शहराध्यक्ष रघुनाथ बागल, अशोक अंभोरे परवेज सौदागर, मजीद बागवान, कलिम बेलदार, गौतम साळवे, गौस लाला, वाल्मिक खुळे, पप्पू शिंदे, गौतम पाईकराव, ऑटोरिक्षाचालक साहेबराव पवार, सय्यद सादिक, रंगनाथ खनपटे, नवनाथ गायकवाड, शेख कासिम, खालेद अन्सारी आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक अशोक उफाडे, सूत्रसंचालन राधाकिशन महाराज हिस्सीकर यांनी केले.