परभणी : मानवत ( जि.परभणी) तालुक्यातील कोल्हा येथील रहिवासी विश्वजीत श्रीकिशन काकडे यांची जर्मनी येथे ऊर्जा संशोधन कार्यासाठी निवड झाली आहे. काकडे हे मुंबई येथील सिमेन्स इंडिया मल्टिनॅशनल कंपनीत व्यवस्थापक पदावर कार्यरत आहेत. कंपनीमार्फत ‘नविनीकरण उर्जेचे संशोधन’ कार्यासाठी जर्मनी दोर्यासाठी कंपनीने त्यांची निवड केली आहे. विभागप्रमुख महादेव उनाडे व मॅथीअस हॉग यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. एका शेतकरी कुटुंबातील मुलाचे उर्जा संशोधन क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय व ग्रामीण भागातील तरूणांना प्रेरणा देणारे आहे. निवडीबद्दल काकडे यांचे विविध स्तरातून स्वागत होत आहे.