प्रा.हरि नरके यांचे व्याख्यान, माजी मंत्री राम शिंदे यांची उपस्थिती
परभणी : पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी (एक जून) सेलू (जि.परभणी) येथे मोटारसायकल रॅली, प्रा.हरि नरके यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
सकाळी नऊ वाजता रायगड कॉर्नर येथून मोटारसायकल रॅलीला सुरुवात होईल. सांगता साई नाट्य मंदिरात आहे. या वेळी अभिवादन कार्यक्रम व प्रा.नरके यांचे व्याख्यान आहे. अध्यक्षस्थानी आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर, उद्घाटक माजी मंत्री राम शिंदे, स्वागताध्यक्ष विनोद बोराडे, माजी आमदार विजय भांबळे, माजी जिल्हा परिषद सदस्य रामनाना पाटील, अशोक काकडे आदींसह विविध पक्ष, सामाजिक संस्था, संघटनांचे पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमासाठी नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.