आमदार संतोष बांगर यांच्या प्रयत्नांना यश
हिंगोली : शिवसेनेचे हिंगोली जिल्हाप्रमुख तथा आमदार संतोष बांगर यांच्या प्रयत्नातून सेनगाव नगरपंचायतीला विविध विकासकामांसाठी चार कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
नगराध्यक्ष ज्योती जगदीश देशमुख व उपजिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांनी यासाठी पाठपुरावा केला. या निधीतून प्रभाग क्रमांक ९ मध्ये ओपन पेस (केशवराव देशमुख लेआऊट) विकसित करण्यासाठी १५ लाख, प्रभाग क्रमांक ११ मध्ये मेन रोड ते गट्टाणी सी.सी.रस्ता बांधकाम करणे १५ लाख, प्रभाग क्रमांक ११ मध्ये गांवडे सर ते मते सर ते ठेंगल नालीवरील धापा बांधकाम करणे १५ लाख, प्रभाग क्रमांक ११ मध्येच इंगोले-पाटील ते भगवान गाढवे सी.सी.रस्ता व नाली बांधकाम करणे १५ लाख, आजेगाव टी पाँईट ते नागनाथ मंदीर सी.सी.रस्ता व नाली बांधकाम करणे १ कोटी ४६ लाख व प्रभाग क्रमांक १७ मध्ये सी.सी.व नाली बांधकाम करणे ३५ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. सेनगावच्या विकासासाठी कटीबद्ध असल्याची ग्वाही आमदार बांगर यांनी यानिमित्ताने दिली आहे. ( वार्ताहर : शिवशंकर निरगुडे, हिंगोली)