परभणी : सेलू येथील गौरव सेवाभावी संस्थेच्या यासेर उर्दू प्राथमिक शाळेतील शिक्षक जावेदखान फिरोजखान पठाण यांना महाराष्ट्र शिक्षक पॅनलच्यावतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पुणे येथील अंकुशराव लांडगे सभागृहात हा सोहळा झाला. सिनेअभिनेत्री डॉ.निशिगंधा वाड, शिक्षक आमदार विक्रम काळे, नाशिक विभागाचे पदवीधर आमदार सुधीर तांबे, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांची प्रमुख उपस्थिती होती. जावेदखान पठाण हे एक उपक्रमशील आणि तंत्रस्नेही शिक्षक म्हणून ओळखले जातात. विद्यार्थ्यांतील कला गुणांना वाव देऊन त्यांच्यात गुणवत्ता विकासासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात. त्यांच्या या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शिक्षक पॅनलचे परभणी जिल्हाप्रमुख पठाण रहेमान लालखान, शितल मापारी, संतोष रत्नपारखे यांच्या निवड समितीने पुरस्कारासाठी निवड केली. पुरस्काराबद्दल पठाण यांचे कौतुक होत आहे