पाथरी : येथील परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकतील अधिकारी श्रीराम दादाराव दळवे यांचा सेवानिवृत्तीबद्दल बुधवारी ( एक जून) गौरव करण्यात आला. अध्यक्षस्थानी संचालक मुंजाजी भाले पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून पालिकेचे प्रशासकीय अधिकारी भाले, श्री सोनवणे. एम.बी.अरबाड, शाखाधिकारी दीपक गवारे, व्ही.के.डुकरे, ओ.डी. सोळंके, सुभाष आहेकर, मोहन डोंगरे, पाटील आदींची उपस्थिती होती. ३१ वर्षांच्या प्रदीर्घ कार्यकाळात दळवे यांनी बँकेच्या विविध शाखांमध्ये सेवा दिली आहे. त्यांच्या कार्यसेवेबद्दल शाल, श्रीफळ, बुके व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमासाठी बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला.