श्री महेश्वर शिवलिंगाचा महाभिषेक सोहळा उत्साहात

श्री महेश्वर शिवलिंगाचा महाभिषेक सोहळा उत्साहात

३०१ यजमानांच्या हस्ते महाआरती

.......................
SAKASH NEWS
https://chat.whatsapp.com/KNhQQNYmKEe49WgafxhdTH

सेलू : शहरातील महेशनगरातील श्री साईबाबा मंदिरात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. देशातील प्रमुख नद्या, बारा ज्योतिर्लिंग व तीर्थक्षेत्रातील पाण्याने शहरातील ३०१ जोडप्यांच्या हस्ते मंदिरातील श्री महेश्वर शिवलिंगाचा महाभिषेक सोहळ्या मोठ्या उत्साहात पार पडला. अभिषेकासाठी लागणारे साहित्य मंदिरातर्फे देण्यात आले होते. दुपारी महाआरती झाली. जलाभिषेक करण्यासाठी सायंकाळीही भाविकांची गर्दी उसळली होती. स्वरांगण प्रस्तुत ‘स्वरभक्ती संध्या’  भक्तिगीतांच्या कार्यक्रमासाठी शिवभक्तांनी गर्दी केली होती. श्री साईबाबा मंदिर समिती तसेच संयोजकांनी पुढाकार घेतला.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!