श्रीनागेश्वरांच्या दर्शनासाठी शिवभक्तांची गर्दी

श्रीनागेश्वरांच्या दर्शनासाठी शिवभक्तांची गर्दी

हातनूरमध्ये महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

श्रीनागेश्वरांच्या दर्शनासाठी शिवभक्तांची गर्दी

सेलू : सेलू तालुक्यातील हातनूर या गावात यादव काळातील श्री नागेश्वरांचे हेमाडपंथी मंदिर आहे. सातशे ते आठशे वर्षांची परंपरा लाभलेले नागेश्वर देवालय विख्यात आहे. नागेश्वर भाविकांचे श्रद्धास्थान असून महाशिवरात्रीनिमित्ताने पंचक्रोशीतील भाविकांनी सकाळपासून सायंकाळपर्यंत दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. यानिमित्ताने मंदिर समितीच्या वतीने भाविकांची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. सायंकाळी दीपउत्सव  साजरा करण्यात आला. वि्द्युत रोषणाईने मंदिर परिसर खुलून गेला होता.

यावर्षी शिवमहापूराण कथा श्रवणासाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गुरूवारी, २७ फेब्रुवारी रोजी सांगता होणार आहे. यानिमित्ताने  दुपारी गाड्या ओढणे, महाप्रसाद आणि सायंकाळी  श्रीची पालखी मिरवणूक आहे. शुक्रवारी २८ फेब्रुवारी रोजी भव्य जंगी कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिर समितीचे अध्यक्ष बालासाहेब आंधळे, दत्तात्रय आंधळे, आसाराम काकडे, ॲड.गोविंदराव शेळके, डॉ.विजयकुमार काकडे, एकनाथराव काकडे, अंकुशराव शेळके, प्रभाकर ठाकरे आदींसह ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत.


हातनूर येथील श्री नागेश्वर मंदिर परिसरात बुधवारी सायंकाळी दीपोत्सव साजरा करण्यात आला. परिसर विद्युत रोषणाईने झळाळून गेला होता.( छायाचित्र सौजन्य- पूनमचंद खोना, सेलू)

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!