औंढा नागनाथमध्ये भाविकांची मोठी गर्दी

औंढा नागनाथमध्ये भाविकांची मोठी गर्दी

हिंगोली : महाशिवरात्री निमित्त देशातील आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथे ‘हर हर महादेव’ आणि ‘बम बम भोले’ च्या गजरात शेकडो भाविकांनी नागनाथ महादेवांच्या दर्शनासाठी गर्दी केली होती.
मंगळवारी मध्यरात्री मंदिर फुलांच्या माळांनी सजविण्यात आले. त्यानंतर साडेबारा वाजता नागनाथ महादेवांची शासकिय महापूजा झाली. यावेळी आमदार संतोष बांगर, जिल्हाधिकारी अभिनव गोयल, उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी सपत्नीक नागनाथ महादेवाची पूजा केली. सुमारे एक ते दीड तास चाललेल्या यापुजेमध्ये नागनाथाला दुग्धभिषेक करण्यात आला. यावेळी संस्थानचे मुख्य पुजारी तुळजादास भोपी, हरिदर भोपी, वैजनाथ पवार, सुरेंद्र डफळ यांच्यासह संस्थानचे कर्मचारी उपस्थित होते. त्यानंतर आज पहाटे दोन वाजता मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. दरम्यान, पहाटे पासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. महाराष्ट्रासह इतर राज्यातील भाविक दर्शनासाठी आले आहेत.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!