प्रिन्स इंग्लिश स्कूलमध्ये मराठी राजभाषा दिन उत्साहात
सेलू : श्रीराम प्रतिष्ठान संचलित एल. के. आर. रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूल येथे मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय रोडगे यांनी प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन झाले. कार्यक्रमात मराठी शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. शिक्षिका अश्विनी हिबारे, अयोध्या चौरे, अनिता घुगे यांना गौरविण्यात आले. अध्यक्षीय भाषणात डॉ.संजय रोडगे यांनी मराठी भाषेला केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिल्याने ही आपल्या सर्वांसाठी आनंदाची बाब असल्याचे सांगितले व विद्यार्थ्यांना मराठी भाषेचे महत्त्व समजावून मार्गदर्शन केले.
यानिमित्ताने विद्यार्थ्यांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये मराठी राजभाषा दिनाविषयी माहितीपर भाषण, काव्यवाचन, एकपात्री नाटक, वैयक्तिक नृत्य, सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे सादरीकरण तसेच शेतकऱ्यांच्या जीवनावर आधारित काव्यवाचन यांचा समावेश होता. मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त गीत गायन देखील करण्यात आले. प्रास्ताविक अश्विनी हिबारे यांनी केले. सूत्रसंचालन अमृता लाटे व सृष्टी कदम या विद्यार्थिनींनी केले, तर आभार अयोध्या चौरे यांनी मानले. प्राचार्य कार्तिक रत्नाला, प्रगती क्षीरसागर, मीरा मेरिंडा उपस्थित होते.